क्राईम

खंडाळा तालुक्यात महिलेलाचा विनयभंग; भांडण सोडवण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण – तिघांविरोधात गुन्हा दाखल


🔴 खंडाळा तालुक्यात महिलेलाचा विनयभंग; भांडण सोडवण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण – तिघांविरोधात गुन्हा दाखल

(जि. सातारा) – खंडाळा तालुक्यातील जवळे ते कवठे या डांबरी रस्त्यावर एका महिलेला विनयभंग व धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री उशिरा घडला. फिर्यादी महिला यांनी दिलेल्या माहितीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ नोव्हेंबर रोजी रात्री अंदाजे ११.४५ वाजता खंडाळा तालुक्यातील एका गावातील बाळाचं माळ शिवारात फिर्यादी जात असताना आरोपी विपीन आनंदा गायकवाड यांनी “आयघाल्यांनो दाखवतो” असे म्हणत अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादीचा उजवा हात पकडून व साडीचा पदर ओढून विनयभंग केला. या कृत्यामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली.या घटनेदरम्यान आरोपीचे साथीदार रणजित शामराव गायकवाड, सुजित शामराव गायकवाड, तसेच सुजितचे पळशी येथील दोन मावसभाऊ (आडनाव कांबळे) हेही घटनास्थळी आले.

भांडण सोडविण्यासाठी आलेल्यास त्यादेखील मारहाण केली.👇

गावातील युवक अजय केशव भोसले हे परिस्थिती शांत करण्यासाठी तेथे आले असता, आरोपींनी त्यांच्यावर शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली.फिर्यादीच्या मते आरोपींनी मुद्दामहून, उद्देशपूर्वक हा प्रकार घडवून आणला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.पो. नि. एस. एस. शेळके, खंडाळा पोलीस ठाणे,सहाय्यक पोलीस फौजदार जाधवयांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

 पुढील तपास सुरू असून फरार असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी खंडाळा पोलिसांकडून पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *