क्राईम

पारगाव येथे पादचाऱ्याचा आयशर टेंपोच्या धडकेत मृत्यू


खंडाळा (जि. सातारा) — पुणे–सातारा महामार्गावर पारगाव हद्दीत झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू .

 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बापुराव बर्गे (वय 38, व्यवसाय मेकॅनिक, रा. खंडाळा) यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, दि. 04 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10 वाजता, पारगाव हद्दीतील हॉटेल ताऊजी समोरील पुणे–सातारा महामार्गावर एक पांढऱ्या रंगाचा आयशर टेंपो भरधाव वेगात येऊन रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला.

 

अपघातानंतर माहिती मिळताच बापुराव बर्गे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता, एक पुरुष जातीचा इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत झाल्याचे आढळले. मयताच्या खिशात कोणतीही ओळखपत्रे, मोबाईल वा कागदपत्रे सापडली नसल्याने तो अनोळखी इसम असल्याचे समजले.

 

मयत इसमाचे वय अंदाजे 55 ते 60 वर्षे, अंगाने काळा सावळा, अंगात पांढरा फुल बाह्यांचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट अशी वेशभूषा होती.

 

अपघाताची माहिती देताच अँम्बुलन्स व खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पांढऱ्या रंगाच्या आयशर टेंपोच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *