नवीन बाह्यवळण मार्गावर भीषण अपघात; एक जण जागीच ठार दोन जण जखमी..
लोणंद:चांदोबाचा लिंब पासून नवीन लोणंद बायपास पालखी रोडवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार एका आयशर टेंपोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तीघांपैकी एक जागीच ठार झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहीती मिळत आहे. लोणंद पोलीसांकडून घटनास्थळी झालेला ट्रॅफिक जाम सुरळीत करण्यात आला तसेच जखमीना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम चालू असून लोणंद पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.







