क्राईम

⚡ खेड बुद्रुकमध्ये विजेच्या कडकडाटात शेळीचा मृत्यू


बुधवार दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी चार ते साडेचारच्या सुमारास झालेल्या वादळी पावसादरम्यान मौजे खेड बुद्रुक (ता. खंडाळा, लोणंद) येथे वीज कोसळून एका शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या घटनेत पशुपालक लहू हनुमंत माने (रा. माने वस्ती, खेड बुद्रुक) यांचे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसासह कडकडाटी विजेमुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर दर्शन काकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वादळी पावसाच्या काळात पशुधन सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *