क्राईम

हेडलाईन :-पाडळी येथे किसन (आबा) शेंडगे यांच्या पुढाकारातून महासमाधान शिबिराचे आयोजन


लोणंद/खंडाळा, दि. १६ — ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांचे तत्काळ निराकरण व्हावे आणि शासनाच्या विविध योजना व सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने “छत्रपती शिवाजी महाराज महासमाधान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन किसन (आबा) शेंडगे मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे शिबिर शुक्रवार, दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहिल्यादेवी सभागृह, पाडळी (ग्रामपंचायत टोनजरी) येथे पार पडणार आहे.

या शिबिरामध्ये नागरिकांना १५ पेक्षा जास्त महत्त्वाच्या शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यात प्रामुख्याने

मतदान कार्ड काढणे

आधार कार्ड दुरुस्ती व नवीन आधार नोंदणी

रेशनकार्डमधील नाव दुरुस्ती/नवीन रेशनकार्ड

7/12 उताऱ्यातील चुका दुरुस्ती

उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र

नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र

अकृषिक (NA) परवानगी व मार्गदर्शन

शासकीय योजनांचा लाभ मंजुरी

विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप

ई-मोजणी अर्ज व शेतकऱ्यांसाठी विविध नोंदणी

प्रलंबित फेरफार व तक्रारींचा निपटारा

अशा विविध सेवा नागरिकांना मिळणार आहेत.

या उपक्रमामुळे ग्रामस्थांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागणार नाहीत, तसेच वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक किसन (आबा) शेंडगे यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *