क्राईम

(खंडाळा) म्हावशी झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या


(खंडाळा) म्हावशी झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

खंडाळा (ता. २४ सप्टेंबर २०२५) — खंडाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडाळा तालुक्यातील म्हावशी परिसरात आज सकाळी ५:३० वा च्या सुमारास किसनवीर सहकारी साखर कारखाना लोणंद खंडाळा मार्गाच्या च्या परिसरात एका जंगली झाडाला नितेश बालसिंग नरे वय ३३ वर्ष व्यवसाय हेल्पर राहणार रतनपुर सध्या राहणार म्हावशी ता. खंडाळा याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. याबाबतची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन योग्य ती तपासणी करून पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *