क्राईम

वृत्तपत्र उद्योगाच्या प्रश्नांसाठी खंडाळ्यात व्हॉईस ऑफ मीडियाचा एल्गार. तहसीलदारांना दिले निवेदन..


सातारा (खंडाळा) : राज्यातील वृत्तपत्र उद्योगावर वाढत्या आर्थिक ताणामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा तालुक्यात व्हॉईस ऑफ मीडिया व्हीओ इंटरनॅशनल फोरमच्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये वृत्तपत्र उद्योगाला दिलासा देण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या आहेत. कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज व मनुष्यबळ खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जाहिरात दरात किमान १५० टक्के वाढ, शासकीय जाहिरातींच्या देयकांची ३० दिवसांत पूर्तता, जाहिरात वाटपात पारदर्शकता तसेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना न्याय्य संधी देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका व पेन्शन योजनांमध्ये सवलती देण्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला.

राज्यभर सुरू असलेल्या लाक्षणिक आंदोलनाचा एक भाग म्हणून हे निवेदन देण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *