क्राईम

जि.प.प्राथमिक शाळा बिरोबावस्ती, लोणंद येथे नूतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड.


जि.प.प्राथमिक शाळा बिरोबावस्ती, लोणंद येथे सन २०२५ ते २०२७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहात पार पडली. या निवड प्रक्रियेत सर्व पालक, शिक्षक व स्थानिक समाजप्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवत एकमताने नवीन समितीची रचना केली.

 या समितीत शिक्षणप्रेमी म्हणून श्री. लक्ष्मणराव (तात्या) शेळके पाटील यांची निवड करण्यात आली. शाळेच्या विकासासाठी सातत्याने पाठबळ देणाऱ्या व शैक्षणिक चळवळीबाबत संवेदनशील असलेल्या त्यांची उपस्थिती समितीला बळकटी देणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे.

 नवीन समितीत अध्यक्षपदी श्री. धनपाल शेळके पाटील, उपाध्यक्षपदी श्री. दिपक क्षीरसागर, तर सचिव पदी श्री. रामचंद्र केसकर सर यांची सर्वानुमते निवड झाली. तसेच शिक्षकवर्गाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्री. अशोक बोडके सर यांची निवड करण्यात आली.

 समिती सदस्य म्हणून तेजस शेळके, सागर केसकर, सर्जेराव व्हटकर, जयराम शेळके, अभिजित केसकर, अमृता तेलकर, पूजा शहा, प्रियांका पवार, प्रियांका शेळके, देविका राठोड, कोमल शेळके, सोनाली मोरे, रुकसाना काझी व ज्योत्स्ना शेळके या सर्वांची नावे निश्चित करण्यात आली.

 निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक उपक्रम राबविणे, पायाभूत सुविधा उभारणी व शाळा परिसराचे सुशोभीकरण यावर भर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

 नवीन समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक उपक्रमांना नवे बळ मिळेल व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सकारात्मक प्रयत्न होतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *