खंडाळा पोलिसांची मोठी कामगिरी अज्ञात आरोपीचा शोध घेवुन चोरीस गेले महिंद्रा कंपनीचे दोन ट्रॅक्टर असा एकुण १४,१०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
अज्ञात आरोपीचा शोध घेवुन चोरीस गेले महिंद्रा कंपनीचे दोन ट्रॅक्टर असा एकुण १४,१०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त)
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खंबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी चोरीस गेले ट्रॅक्टर व आरोपीचा शोध घेणे कामी दिले सुचनान प्रमाणे पोलीस निरीक्षक सुनिल शेळक यांचे अधिपत्याखली एक पथक तयार करून त्यांना ट्रॅक्टर व आरोपीचा शोध घेणेच्या सुचना दिल्या.
दिनांक ०२/१०/२०२५ रोजीचे रात्री २०.०० वा.ते दिनांक ०३/१०/२०२५ रोजीचे सकाळी ६.४५
वा. दरम्यान मौजे पारगाव ता. खंडाळा जि.सातारा येथुन संतोष नामदेव यादव यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरी झाला असलेची माहीती मिळालेने त्यांनी गुन्हेप्रकटीकरण शाखेच्या अंमलदार पो.हवा. नितीन महांगरे व पोलीस अंमलदार अमित चव्हाण यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे त्यांनी ४० सी.सी.टीव्ही फुटेज तपासणी करून व गुप्त माहीती व्दारे माहीती प्राप्त केली. सदरचा ट्रॅक्टर हा इंदापुर येथुन जात असलेने तेथे जावुन आरोपी व ट्रॅक्टर ताब्यात घेतला. अधिकचा तपास केला असता ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी उघडकीस आली असुन त्यांनी भुईज पोलीस ठाणे हद्दीतील ट्रॅक्टर चोरी करून तो कर्नाटक येथे ठेवलेचे सांगीतलेने सदरचा ट्रॅक्टर हा तपासी पथकाव्दारे हिरोळी राज्य कर्नाटक येथुन जप्त करण्यात आला असुन एकुण १४,१०,०००/- रूपये किंमतीच मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.
श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खंबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, पोलीस निरीक्षक सुनिल शेळके, सहा. पोलीस निरीक्षक मस्के, नितीन महांगरे, चंद्रकांत धापते, अमित चव्हाण, गोविंद आंदळे, महिला अंमलदार हिप्परकर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी अंमलदार यांचे श्री. तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विशाल खंबे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांनी अभिनंदन केले आहे.







