क्राईम

सातारा येथे दोन जीएसटी अधिकारी ₹२०,००० लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात


सातारा येथे दोन जीएसटी अधिकारी ₹२०,००० लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात.

सातारा (दि. ०१ ऑक्टोबर) :

साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज मोठी कारवाई करत जी एस टी. निरीक्षकांना ₹२०,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

फिर्यादी यांनी सन २०२२-२३ मधील जीएसटी टॅक्स माफी व सी व्ही माफी फंड प्रकरणात आवश्यक असलेली कागदपत्रे व मंजुरी मिळण्यासाठी सातारा येथील रोहन सतीश देवकर (राजस्व निरीक्षक, वसुल व बंदोबस्त, सातारा) आणि अक्षय मोहन चव्हाण (राजस्व निरीक्षक, सातारा) या दोन्ही अधिकाऱ्यांनी फिर्यादीकडे ₹२५,००० लाचेची मागणी केली होती.

तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार आरोपींनी तडजोडीअंती ₹२०,००० लाच स्वीकारत असतानाच त्यांना पकडण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शिरीष सर्डेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 एसीबीचे आवाहन :

नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

हेल्पलाईन क्रमांक : १०६४ / ९६०७६७६७०६

वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *