खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे शुक्रवार दि १० रोजी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली असून, विहिरीत पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
खंडाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव अमोल रामचंद्र राठोड (वय ३०, मूळ रा. मसकापुर, ता. पातुर, जि. अकोला, सध्या रा. पारगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) असे आहे. सकाळी सुमारे ११.३० वाजता विकास मारुती गाढवे यांच्या शेतातील विहिरीत तो अपघाताने पडला. स्थानिकांनी तातडीने मदतीस धाव घेत विहिरीतून बाहेर काढून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, खंडाळा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक मा. श्री. सुनील शेळके यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे पारगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे