लोणंद एम,आयडीसी परिसरात बिंगो चक्री जुगार अड्डे फोफावले
लोणंद एम,आयडीसी परिसरात बिंगो चक्री जुगार अड्डे फोफावले
लोणंद (ता. खंडाळा) :
लोणंद एमआयडीसी परिसरात बिंगो चक्रीसह विविध प्रकारचे जुगार अड्डे मोठ्या प्रमाणावर सुरू असून ते दिवसेंदिवस जोमात सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या अड्ड्यांमुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत असून तरुण वर्ग त्याकडे ओढला जात आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या या बिंगो चक्री जुगार अड्ड्यांमुळे परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. जुगार खेळण्यासाठी आसपासच्या गावांमधून मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ असते. त्यामुळे शांतताप्रिय नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिकांनी अनेकदा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले असले तरी कारवाईचा अभाव जाणवत आहे. योग्य वेळी धडक कारवाई न झाल्यास या अड्ड्यांचे प्रमाण आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नागरिकांकडून प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी होत आहे.
“माझं काही नाही हो, साहेबांचंच तेवढं बघा.”

