NHAI व ठेकेदार यांच्या लेखी आश्वासनानंतर युवकाचे उपोषण मागे.
शिरवळ प्रतिनिधी:- अभिजीत चव्हाण
शिरवळ लोणंद महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले. महामार्ग प्राधिकरणाला वारंवार लेखी तक्रारी करून देखील कोणतीही दखल न घेतल्याने खंडाळा तालुक्यातील भोळी गावातील युवकाने ठेकेदार व रस्ते प्राधिकरण(NHAI) यांच्या विरोधात भोळी येथे गेली तीन दिवस उपोषणा केले.
चौथ्या दिवशी संबंधित प्रशासन व रस्ते प्राधिकरण यांनी समक्ष भेट देऊन सर्व रस्त्याची पाहणी करत युवकाच्या मागण्या मान्य करत लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास सांगितले.
तुम्ही सांगल त्या पद्धतीने आम्ही काम करू व आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक लाऊ अशी ग्वाही प्राधिकरणाकडून व ठेकेदाराकडून देण्यात आली. पंचक्रोशीतील प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांकडूनयुवकाचे आभार व्यक्त केले जात आहेत.