लोणंदमध्ये पोलिसांच्या मदतीने सुरू असलेले अवैध धंदे आठ दिवसात बंद करा- भाजपा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांची मोर्चाद्वारे मागणी.
लोणंद प्रतिनिधी विजय शेळके
रविवारी दि 5 लोणंद शहरांमध्ये पोलीस प्रशासन व नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधामध्ये 400 ते 500 तरुणांचा दंडाला काळ्या फिती बांधून मोर्चा काढण्यात आला, या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये तरुणांच्या संतापजनक घोषणा ऐकावयास मिळाल्या.

आपला बचाव करण्यासाठी लोणंद नगरपंचायतीने व्यापारी असोसिएशनचे डॉल्बी बंद बाबतचे पत्र घेतले व तरुणांच्या रोशाला ऐनवेळी व्यापारी असोसिएशनला एकटे सामोरे जावे लागेल.
काही दिवसांपूर्वी गणपती मंडळांना डॉल्बी न लावणे बाबत सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या परंतु नवरात्री काळात राजकीय दबावामुळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी सर्व नियम धाब्यावर ठेवून राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवण्यास परवानगी दिली त्याचबरोबर बंदी असणाऱ्या लेझर लाईटचा वापर लोणंद शहरात करण्यात आला.विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री दहा वाजेपर्यंत असताना लोणंदमध्ये डॉल्बी बारा वाजेपर्यंत वाजली. या सर्वस्वी गोष्टीला पोलीस प्रशासन जबाबदार असून लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांच्या काळामध्येच लोणंदमध्ये खुलेआम व्यवसाय, चक्री व्यवसाय, गांजा व्यवसाय,मटका व्यवसाय असे अवैध धंदे बोकाळले आहेत, हे सर्व अवैद्य धंदे पुढील आठ दिवसांमध्ये बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करू असे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी तीव्रशब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोणंदच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलीस प्रशासन विरोधात मोर्चा निघाल्याचे लोणंदकरांनी अनुभवले.
या मोर्चामध्ये लोणंद शहरातील गणपती व नवरात्री उत्सवाचे सर्व तरुण पदाधिकारी कार्यकर्ते सामील झाले होते.लोणंद नगरपंचायती पासून निघालेल्या या मोर्चाची सांगता शिरवळ चौकामध्ये ठिय्या आंदोलनामध्ये झाली.
यावेळी कय्युम मुल्ला,जावेद पटेल,सुनील यादव, नानासाहेब शेळके व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली.
गेली चार वर्षांमध्ये पोलिसांच्या मेहरबानीने बोकाळेलेले सर्व अवैद्य धंदे, वाढती गुन्हेगारी व इतर प्रकार लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब,महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.प्रा. राम शिंदे साहेब,राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे भाऊ, राज्याचे बांधकाम मंत्री ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले, पोलीस अधीक्षक तुषार जोशी साहेब यांच्यासमोर विस्तृतपणे मांडणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी यावेळी सांगितले.
या मोर्चामध्ये भैरवनाथ गणेशोत्सव मंडळ, शास्त्री चौक मित्र मंडळ, तानाजी चौक मित्र मंडळ, अहिल्यादेवी मित्र मंडळ, रणवीर मित्र मंडळ,नवज्योत मित्र मंडळ, माळी आळी मित्र मंडळ,वेताळ पेठ गणेशोत्सव मित्र मंडळ अशा अन्य मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“हर्षवर्धन पाटील यांचा मोर्चा, आणि जयकुमार गोरे यांचे पोलिसांना खडे बोल.”
पोलिसांच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू असतानाच हर्षवर्धन शेळके पाटील यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना फोन लावला
सर्व प्रकार गोरेंना फोनवर सांगता त्याच क्षणी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याला जयकुमार गोरे यांनी तरुणांवरती आक्रमक होण्याची वेळ का आणली ? असा सवाल केला
सदरचा सर्व प्रकार पोलीस अधीक्षक यांना बोलणार असल्याचे खडेबोल जयकुमार गोरे यांनी पोलिस अधिकाऱ्याला सुनावले








